पुणे . नागपूर . औरंगाबाद . कोल्हापूर . नाशिक . सांगली . अमरावती . जळगाव . चिपळूण . ठाणे

१० शहरे . ५००० उद्योजक

महाराष्ट्रातील तरुण उद्योजकांना स्टार्ट अप विषयात योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आणि स्टार्टअप संदर्भातील विविध उपक्रमांचा महाराष्ट्रातील उद्योजकांना लाभ मिळण्यासाठी स्किलसीखो डॉट कॉम आणि मेंटॉरप्रेन्युअर्स या संस्थेने महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रा या उपक्रमाचे आयोजन केले आहे.

सदर उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या कार्यक्रमात, भारतीय स्टार्ट अप विश्वातील नामांकित मराठी स्टार्ट अप उदयोजक देखील सहभागी होणार असून, सहभागी नव उद्योजकांना त्यांच्याशी थेट संवाद साधता येईल तसेच विविध कार्यशाळांच्या माध्यमातून स्टार्ट संदर्भातील विविध विषयांमध्ये मार्गदर्शन सुद्धा मिळेल.

स्टार्ट अप या विषयातील मार्गदर्शन, रिसोर्सेस, इन्क्युबेटर, असलरेटर यासारखे स्टार्ट अपशी संबंधित विविध कार्यक्रम, फंडिंग मिळविण्याची सर्वात महत्वाची प्रोसेस, आणि स्टार्ट अप इको सिस्टिमकडून स्टार्टअप्सनां मिळणारे फायदे हे सर्वच इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित आहेत. हि परिस्थिती बदलणे आणि महाराष्ट्रातील छोट्या शहरांमध्ये स्टार्ट अप इकोसिस्टम रुजवणे हे या महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेचे ध्येय आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, किमान ५००० उद्योजकांपर्यंत पोहचण्याचे लक्ष्य आहे.

महाराष्ट्रातील १० शहरे

मराठी भाषेत आयोजन

१०००+ विद्यार्थी

५०००+ उदयोजक

पिचिंग कॉम्पिटिशन

स्टार्टअप तज्ज्ञांकडून मार्गदर्शन

गुंतवणूक मिळवण्याची संधी

व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी

बिझनेस नेटवर्किंग

ऑनलाईन स्टार्टअप प्रशिक्षण

EVENT DETAILS

POWERED BY

 

For guest speaking, partnership and sponsorship opportunities send us mail at following E-mail address :

kunal at skillsikho dot com

shraddha at mentorpreneurs dot biz